आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक मानसिक आरोग्य दिन 2023 निमित्त मानसिक आरोग्य परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे आभासी माध्यमातून बीजभाषण


डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते निम्हन्स मधील नवीन सुविधांचे उद्घाटन आणि टेली-मानस च्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण

"मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी अधिकार"

Posted On: 10 OCT 2023 4:00PM by PIB Mumbai

 

"मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी अधिकार आहे" असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय मानसिक आरोग्य परिषदेत केले. त्यांनी निम्हन्स मधील नवीन सुविधांचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले आणि टेली-मानस च्या बोधचिन्हाचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना डॉ. मांडवीय यांनी देशातील सर्व नागरिकांना मानसिक आरोग्य सेवेचे फायदे सर्वात दुर्गम भागात पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी कार्य करण्याच्या संकल्पाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, “वर्ष 2015-16 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण हा एक अग्रगण्य उपक्रम होता ज्याद्वारे उघड झाले कि 10 टक्के लोकसंख्या ही मानसिक आरोग्य समस्याग्रस्त असून परिणामस्वरूप प्रभावित लोकांवर, समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडला आहे.नॅशनल टेली-मेंटल हेल्थ प्रोग्राम (टेली-मानस) चे उदाहरण देऊन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावर भर दिला की "मानसिक आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा एक शक्ती गुणक आहे." ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या टेली मानस सेवेने आजमितीस 3,50,000 हून अधिक लोकांचे समुपदेशन करण्यात आले असून सध्या 44 टेली मानस कक्षाद्वारे 2000 लोकांना समुपदेशन प्रदान करण्यात येत आहे. या हेल्पलाइनवर दररोज 1000 हून अधिक कॉल्स येत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी टेली-मानस च्या बोधचिन्हाचे अनावरण केले आणि बंगळुरूतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस निम्हन्स च्या सेंटर फॉर ब्रेन अँड माईंड या नवीन प्रशासकीय कार्यालय संकुलातील प्लॅटिनम ज्युबिली सभागृह आणि शैक्षणिक सुविधा नामक नवीन सुविधांचे उद्घाटन केले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की "आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांनी मानसिक आरोग्य, मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आणि घातक पदार्थांच्या सेवनातून होणाऱ्या विकारांसाठी प्राधान्य सेवा म्हणून प्राथमिक आरोग्य सेवांसोबत मानसिक आरोग्य सेवांचे एकत्रीकरण सुलभ केले आहे.

डॉ. मांडवीय पुढे म्हणाले, "मानसिक आरोग्य सेवेची व्याप्ती आणि उपलब्धता सुधारण्यासाठी, सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 743 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय उपक्रमांना समर्थन देण्यात आले आहे."

डॉ. मांडवीय यांनी राज्यांच्या कामगिरीला दाद दिली आणि राष्ट्रीय टेली मानस आरोग्य कार्यक्रमा अंतरगत  सर्वाधिक कॉल केल्याबद्दल राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना स्मृतीचिन्हासह प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांना अनुक्रमे  पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि प्रभाव अधोरेखित करताना, डॉ. पॉल म्हणाले की "मानसिक आरोग्य समोर दिसत नसल्याने  व्यक्ती, कुटुंब आणि इतरांपर्यंत पोहोचण्याआव्हानात्मक ठरते. परंतु त्याच वेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की देशाची उत्पादकता, निरामयता, सामाजिक समतोल देखील मानसिक आणि आध्यात्मिकरित्या निकोप आरोग्याशी  जोडलेला आहे. त्यांनी "संपूर्ण समाजाचा दृष्टीकोन, म्हणजेच जन चळवळ  पध्दतीमुळे पीडितांना मदत करण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात मोठा फायदा होईल" यावर भर दिला.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966367) Visitor Counter : 87