भारतीय निवडणूक आयोग
छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका, 2023
Posted On:
09 OCT 2023 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023
निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका, 2023 साठीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर तैनाती आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक तयार केले आहे.
आयोगाने सर्व संबंधित बाबींचा विचार करून लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या संबंधित तरतुदींनुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांच्या राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशीलांसाठी येथे क्लिक करा, please 1
तपशीलांसाठी येथे क्लिक करा, please 2
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1966007)
Visitor Counter : 155