पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल हॉकीच्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 06 OCT 2023 10:02PM by PIB Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

संघाची दृढ निष्ठा, ध्यास आणि उर्जा यांचे कौतुक करून पंतप्रधानांनी भविष्यातील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या एक्स   या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे

"आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकासहित मिळवलेले यश उल्हासित करणारे आहे. या विशेष कामगिरीसाठी हॉकीच्या संघाचे हार्दिक अभिनंदन. या संघाची दृढ निष्ठा ध्यास आणि ऊर्जा यामुळे त्यांनी स्पर्धाच नाही तर अगणित भारतीयांची मनेदेखील जिंकली आहेत. हे यश म्हणजे त्यांच्यातील क्षमतेचा एक दाखला आहे. यापुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा.

***

Jaydevi PS/Vijaya/CYadav 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965314) Visitor Counter : 81