खाण मंत्रालय
तिसऱ्या विशेष स्वच्छता मोहीमेद्वारे 341 स्वच्छता उपक्रम राबविण्याचे खाण मंत्रालयाचे उद्दिष्ट
Posted On:
06 OCT 2023 10:17AM by PIB Mumbai
सरकारी कार्यालये स्वच्छ ठेवण्यासाठी आणि परिसरात उत्तम अनुभव देण्यासाठी खाण मंत्रालय आणि त्याच्या केंद्रीय सार्वजनिक सहभागी संस्था आपापल्या परिसरात तिसऱ्या विशेष स्वच्छता मोहीमेचे (3.0) आयोजन करत आहे. खाण मंत्रालयाचे सचिवांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे 30 सप्टेंबर रोजी सर्व विभागीय कार्यालयांची बैठक घेऊन विशेष मोहीम 3.0 घेण्यासाठी सर्व कार्यालयांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी विविध श्रेण्यांतर्गत उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आणि साफसफाईची ठिकाणे निश्चित करण्यात आली. नोंदीचे व्यवस्थापन आणि कार्यालयामधील कामाच्या ठिकाणी उत्तम अनुभव देणे यावर या मोहिमेदरम्यान मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. खाण मंत्रालय आणि इतर विभागांनी विशेष मोहीम 3.0 अंतर्गत 341 स्वच्छता मोहीम / उपक्रम आखले आहेत.
मंत्रालय आणि त्याअंतर्गत असलेल्या संस्था मोहिमेच्या आठ शिरोबिंदूंच्या पलीकडे जाऊन सर्वोत्तम पद्धती म्हणून विविध उपक्रम हाती घेत आहेत. निसर्गाचे देणे त्यास परत देण्याची संकल्पना पुढे घेऊन मंत्रालयाकडून या अभियानांतर्गत नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
विशेष मोहीम 3.0 दरम्यान, खाण मंत्रालय, शास्त्री भवनाचे मुख्य प्रवेशद्वार आणि वऱ्हांड्यासह कार्यालयाच्या परिसराचे नूतनीकरण करत आहे.ऊर्जा बचतीचा उपाय म्हणून, खाण मंत्रालयाच्या सर्व कार्यालयांमधून जुन्या तापमान नियंत्रण शेगड्या काढून टाकल्या जात आहेत. प्रचारफलक स्टँडी आणि फ्लेक्सेस काढून टाकून त्याठिकाणी डिजिटल स्क्रीन वापरले जात आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) करत देशभरातील 15 भू-वारसा स्थळांवर विविध उपक्रम राबवणार जाणार आहेत. ही भौगोलिक-वारसा स्थळे उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि त्रिपुरामध्ये आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आपल्या केंद्रीय मुख्यालयात देशाच्या विविध भागांतून विविध भूवैज्ञानिक क्षेत्र तपासणी दरम्यान गोळा केलेले प्राचीन खडकांचे नमुने वापरून त्यातून नवे डिझाईन (रॉक स्कल्पटिंग) तयार करेल.
विविध कार्यालयांमध्ये अनेक नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को), नाल्को नगर टाऊनशिप, भुवनेश्वर येथे गांडूळ खत प्रकल्पाची पुनर्रचना करत आहे तसेच एक औषधी वनस्पती उद्यान तयार करत आहे. नाल्को आपल्या दामनजोडी आणि अंगुल युनिटमध्येही अशाच प्रकारच्या औषधी वनस्पतींची बाग विकसित करत आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत आहे. वर्षाजल संकलन (रेनवॉटर हार्वेस्टिंग) पासून ते पाणवठ्याच्या स्वच्छतेपर्यंत, पक्षांसाठी अन्न टाकण्यापर्यंत काही शाश्वत उपक्रम एचसीएल विशेष मोहीम 3.0 अंतर्गत हाती घेत आहे.
मिनरल एक्सप्लोरेशन कन्सल्टन्सी लिमिटेड (MECL) निळ्या आणि हिरव्या रंगाच्या बादल्या ठेवून ‘स्रोतापासून ते घनकचरा विलगीकरणापर्यंत’ करण्यास प्रोत्साहन देत आहे. ही कंपनी सेंद्रिय खतांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपोझिट खड्डे देखील बांधत आहे.
इंडियन ब्युरो ऑफ माईन्स (IBM) देखील विशेष मोहीम 3.0 चे आचरण करत आहे ज्यात अनेक वृक्षारोपण कार्यक्रमांसह कंपोस्ट खड्डे तयार करणे आणि वनस्पती बाग बांधणे अशी कामे हाती घेत आहे.
NIRM आणि JNARDDC सारखे इतर विभाग देखील या मोहिमेदरम्यान स्वच्छतेसाठी अनेक शाश्वत मोहिमा राबवत आहेत.
***
N.Meshram/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965174)
Visitor Counter : 98