गृह मंत्रालय

सिक्कीमला सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे आश्वासन


राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा (एसडीआरएफ ) आपला हिस्सा सिक्कीमला देण्यासाठी केंद्राची मान्यता

राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाची (आयएमसिटी ) स्थापना

Posted On: 06 OCT 2023 10:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सिक्कीमच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असून   केंद्र सरकारने सिक्कीम सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सिक्कीममधील बाधित लोकांच्या मदतीसाठी राज्याला सहाय्य करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी 2023-24 या वर्षासाठी  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे  (एसडीआरएफ)  केंद्रीय हिश्श्याचे   44.80 कोटी रुपयांचे दोन्ही हप्ते  अग्रीम देण्यास मान्यता दिली आहे. हिमनदी तलाव फुटून आलेला पूर   (जीएलओएफ )/ढगफुटी /अचानक आलेल्या पुरामुळे  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी, गृह मंत्रालयाने एक आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाची (आयएमसीटी ) स्थापना केली  आहे. ,हे पथक लवकरच   राज्यातील बाधीत  भागांना भेट देईल. आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या मूल्यांकनाच्या आधारे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एनडीआरएफ )   सिक्कीमला पुढील अतिरिक्त केंद्रीय सहाय्य, निर्धारित प्रक्रियेनुसार मंजूर केले जाईल. 
4 ऑक्टोबरच्या पहाटे, हिमनदी तलाव फुटून आलेलला पूर   (जीएलओएफ )/ढगफुटी /अचानक  पूर आल्याच्या घटनांमुळे, तीस्ता नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली, यामुळे  अनेक पूल, राष्ट्रीय महामार्ग -10 चा  काही भाग वाहून गेला तर चुंगथांग धरण फुटले तसेच सिक्कीममधील नदी खोऱ्याच्या वरच्या भागातील अनेक लहान शहरे आणि अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना याचा फटका बसला.
सिक्कीममधील परिस्थितीवर केंद्र सरकार सर्वोच्च स्तरावर दिवसरात्र चोवीस तास  बारकाईने लक्ष ठेवून आहे.परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना पूरक म्हणून  वेळेवर रसद संसाधने एकत्रित करून केंद्र सरकार सिक्कीम सरकारला सर्वोतोपरी  मदत करत आहे.पुरवण्यात आलेल्या रसद सहाय्यामध्ये,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या  (एनडीआरएफ ) पुरेशा पथकांची तैनाती  ; आवश्यक शोध आणि बचाव उपकरणांसह भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि लष्कराचे जवान यांचा समावेश आहे. उर्जा, दूरसंचार आणि रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयांचे तांत्रिक पथक राज्यातील नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा आणि दळणवळण जाळे  वेळेत पूर्वपदावर आणण्यासाठी  मदत करत आहेत.

***

NM/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964922) Visitor Counter : 99