इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आर्थिक सेवा पटलावर सध्याचे भाषाविषयक अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने भाषिणी (डीआयबीडी) आणि आरबीआयएचचे सहकार्य

Posted On: 04 OCT 2023 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रात,आर्थिक सेवा पटलावर सध्याचे भाषाविषयक अडथळे दूर  करण्याच्या उद्देशाने  रिझर्व्ह बँक नवोन्मेष केंद्र  (आरबीआयएच ) आणि डिजिटल इंडिया भाषिणी  विभाग (डीआयबीडी ) भाषिणी  यांनी सहयोग केला आहे. एकत्रित प्रयत्नांद्वारे, दोन्हीही विभाग भाषिक सर्वसमावेशकतेला चालना देणारे नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सज्ज आहेत.

वित्तीय सेवा क्षेत्रातील भाषिक समावेशकतेची तीव्र गरज ओळखून,डीआयबीडी आणि आरबीआयएचने यापूर्वीच  जागतिक  फिनटेक फेस्ट दरम्यान एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर  स्वाक्षरी केली आहे.ही धोरणात्मक भागीदारी स्थानिक भाषांमध्ये संप्रेषण निर्माण करून आर्थिक सेवांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे. वापरकर्त्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत  डिजिटल वित्तीय सेवा मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी,शेवटी सर्वांसाठी विनाअडथळा बँकिंग अनुभवासाठी प्रयत्नशील असणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

मुंबईतील जागतिक फिनटेक फेस्ट दरम्यान डिजिटल इंडिया भाषिणी  विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी त्यांच्या या प्रयत्नात आवाजाची क्षमता एक माध्यम म्हणून अधोरेखित केली. आवाजाचा माध्यम म्हणून उपयोग करून, भाषिणी  आर्थिक सर्वसमावेशकता, आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरतेला चालना देऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. डिजिटल युगात विश्वास, वेग आणि सोई सुविधा यांच्या महत्त्वावर आरबीआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भर दिला.

बदलते  फिनटेक क्षेत्र , स्मार्टफोनचा वाढलेला वापर  आणि कमी झालेल्या डेटा वापर खर्चाच्या पार्श्वभूमीवर हे सहकार्य करण्यात आले आहे.    सुरुवातीचे महत्वाचे   पाऊल म्हणून, भाषिणी  अनेक भाषांमध्ये विनाअडथळा पतपुरवठ्यासाठी  सार्वजनिक तंत्रज्ञान मंच  सुरू करण्याची योजना आखत आहे.  वित्तीय संस्थांद्वारे पतपुरवठा  सुव्यवस्थित करणे आणि वाढवणे , मोठ्या आर्थिक समावेशनामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान देणे आहे हे या मंचाचे उद्दिष्ट आहे.

डीबीआयडी बद्दल

डिजिटल इंडिया भाषिणी  विभाग हा   भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन  विभाग 8 कंपनी अंतर्गत विभाग आहे . "आत्मनिर्भर भारतामध्ये डिजिटल समावेशन  आणि डिजिटल सक्षमीकरण सुनिश्चित  करण्याच्या दृष्टीने भाषिक अडथळे दूर  करण्याच्या उद्देशाने हितसंबंधीत  , भागीदारी संस्था आणि नागरिकांसाठीची  वैविध्यपूर्ण व्यवस्था  सक्षम करण्यासाठी स्वाभाविक भाषा तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हा भाषीणीचा दृष्टिकोन आहे.अधिक जाणून घेण्यासाठी  www.bhashini.gov.in ला भेट द्या किंवा ceo-dibd@digitalindia.gov.in वर मेल करा.

आरबीआयएच बद्दल

रिझर्व्ह बँक नवोन्मेष केंद्र  (आरबीआयएच ) – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  (आरबीआय ) पूर्ण मालकीची उपकंपनी असून अब्जावधी भारतीयांसाठी विनाअडथळा वित्तपुरवठा उपलब्ध  करण्यासाठी काम करणारी संस्था आहे.अधिक जाणून घेण्यासाठी  www.rbihub.in  ला भेट द्या किंवा Communications@rbihub.in वर मेल करा.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1964288) Visitor Counter : 124