पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी गटात कांस्य पदक पटकावणाऱ्या ऐहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 OCT 2023 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी गटात  कांस्य पदक जिंकणाऱ्या  ऐहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने महिला दुहेरीत मिळवलेले हे पहिले पदक आहे.

पंतप्रधानांनी पोस्ट केले:

"कांस्यपदक जिंकल्याबद्दल अहिका मुखर्जी आणि सुतिर्था  मुखर्जी यांचे अभिनंदन. हा एक खास विजय आहे कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने महिला दुहेरीत मिळवलेले हे पहिलेच पदक आहे.

त्यांचे समर्पण, कौशल्य आणि टीमवर्क अनुकरणीय आहे.”

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963458) Visitor Counter : 78