पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये इक्वेस्ट्रीयन ड्रेसेज’च्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अनुष अगरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2023 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये इक्वेस्ट्रीयन ड्रेसेज या अश्वारोहणासह अश्वलीलांच्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अनुष अगरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

X या समाज माध्यमावरील टिप्पणीत पंतप्रधान म्हणाले-

"आशियाई क्रीडा स्पर्धेत इक्वेस्ट्रीयन ड्रेसेज’च्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या अनुष अगरवालचे अभिनंदन. त्याने दाखवलेले कौशल्य आणि समर्पित वृत्ती प्रशंसनीय आहेत. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."

 

* * *

M.Pange/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961821) आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu