पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या आरएस :एक्स प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल इबाद अलीचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 26 SEP 2023 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

हांगचौ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या आरएस: एक्स प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल इबाद अली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नौकानयनातील त्याच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

नौकानयनात  इबाद अलीची शानदार कामगिरी. आशियाई क्रीडा स्पर्धेत आरएस :एक्स  पुरुष स्पर्धेत कांस्यपदक पटकावून त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

आपल्या युवा प्रतिभेसाठी  काहीही अशक्य नाही हे त्याच्या कामगिरीवरून सिद्ध होते.त्याला माझ्या शुभेच्छा.

 

S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960926) Visitor Counter : 75