आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मिथक विरुद्ध तथ्य


क्षयरोग विरोधी औषधांचा तुटवडा असल्याचा दावा करणारे माध्यमांमधील वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे

Posted On: 26 SEP 2023 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

भारतात क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप  काही माध्यमांच्या वृत्तात केला जात असून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांअंतर्गत अशा औषधांच्या परिणामकारकतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे वृत्त  भ्रामक  आणि चुकीची माहिती देणारे आहेत आणि क्षयरोग विरोधी औषधांच्या साठ्याच्या उप्लब्धतेविषयीची  नेमकी माहिती न घेता  केले जात आहेत.

औषध-संवेदनशील क्षयरोगाच्या  उपचारात दोन महिन्यांच्या कालावधीत चार औषधांचा समावेश आहे 4 FDC (आयसोनियाझिड, रिफाम्पिन, इथाम्बुटोल आणि  पायराझिनामाइड) आणि त्यानंतर दोन महिन्यांचा उपचारात 3 FDC (आयसोनियाझिड, रिफाम्पिन आणि  इथाम्बुटोल) म्हणून उपलब्ध असलेल्या तीन औषधांचा  समावेश आहे. या सर्व औषधांचा सहा महिन्यांहून अधिक काळासाठी पुरेसा  साठा उपलब्ध आहे.

बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या  उपचारात साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीत सात औषधे (बेडाक्विलिन, लेव्होफ्लोक्सासिन, क्लोफेझिमिन, आयसोनियाझिड, इथाम्बुटोल, पायराझिनामाइड आणि इथिओनामाइड) आणि त्यानंतरच्या चार महिन्यांच्या कालावधीत चार औषधे (लेव्होफ्लॉक्सासिन, क्लोफॅझिमाइन, पायराझिनामाइड आणि एथाम्बुटोल) यांचा समावेश आहे. औषध प्रतिरोधक क्षयरोग असलेल्या सुमारे 30% व्यक्तींना सायक्लोसरीन आणि लाइनझोलिड हे औषध घेणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांअंतर्गत   केंद्रीय स्तरावर क्षयरोग प्रतिबंधक औषधे आणि इतर साहित्याची खरेदी, साठवणूक, साठ्याची देखभाल आणि वेळेत वितरण केले जात आहे. अगदी काही ठराविक वेळी वैयक्तिक रुग्णांच्या उपचारात गैरसोय होऊ नये म्हणून राज्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियाना साठीच्या आर्थिक तरतुदींमधून स्थानिक पातळीवर काही औषधांचा साठा करण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्राने याआधीच सायक्लोसरीन गोळ्या केंद्रीय पद्धतीने खरेदी केल्या आहेत. काही राज्यांनी जिल्ह्यांना खरेदी सोपवली आहे; त्यानुसार जिल्ह्य़ांनी आवश्यक त्या ठिकाणी खरेदी केली आहे.

महाराष्ट्रातील क्षयरोग विरोधी औषधांच्या साठ्याचा तपशील जो संबंधित माध्यम अहवाला मध्ये अधोरेखित केला आहे  तो पुढीलप्रमाणे आहे (स्रोत: नि-क्षय औषधी)

Drug Name

Qty of Stock available in Maharashtra (UOM- CAPS/TABS) as on today (24.09.2023)

Cycloserine – 250 mg

6,34,940

Linezolid – 600 mg

86,443

Delamanid - 50 mg

1,53,784

Clofazimine-100mg

79,926

Moxifloxacin - 400 mg

4,56,137

Pyridoxine

7,06,413

क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा तुटवडा अजिबात नाही. राष्ट्रीय स्तरावरील या औषधांच्या  (26 सप्टेंबर 2023) आजपर्यंतच्या  साठ्याचा नि-क्षय औषधी मधील तपशील पुढीलप्रमाणे

Drug Name

Qty of Stock available at National Level under NTEP (UOM- CAPS/TABS) as on today (24.09.2023)

Cycloserine -250 mg

14,79,857

Linezolid – 600 mg

9,95,779

Delamanid - 50 mg

11,37,802

Levofloxacin – 250 mg

28,85,176

Levofloxacin – 500 mg

33,27,130

Clofazimine - 100 mg

12,86,360

Moxifloxacin - 400 mg

2,72,49,866

Pyridoxine

2,72,99,242

अशा प्रकारे, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांअंतर्गत मोक्सीफ्लॉक्सासिन 400मिग्रॅ  आणि पायरीडॉक्सिन चा 15 महिन्यांहून अधिक साठा उपलब्ध आहे. तसेच, ऑगस्ट 2023 मध्ये डेलामॅनिड 50 मिग्रॅ आणि क्लोफाझिमाइन 100 मिग्रॅ ही औषधे खरेदी करण्यात आली  आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आली.

येथे सांगितलेल्या साठ्यांव्यतिरिक्त, ऑगस्ट 2023 मध्ये लाइनझोलिड-600mg आणि कॅप सायक्लोसरीन-250 mg च्या पुरवठ्यासाठी खरेदी आदेश जारी करण्यात आले होते.ही औषधे राज्यांमध्ये पाठवली जात आहेत.

या अत्यावश्यक क्षयरोग प्रतिबंधक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले गेले आहेत. केंद्रीय गोदामांपासून ते प्राथमिक आरोग्य संस्था पर्यंत विविध स्तरांवर साठ्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने नियमित मूल्यांकन केले जाते. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या अहवालांमध्ये नमूद केलेली माहिती भ्रामक  आणि चुकीची आहे आणि ती देशात उपलब्ध असलेल्या टीबी-विरोधी औषधांच्या साठ्याचे योग्य चित्र दर्शवत नाही.

 S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1960881) Visitor Counter : 118