पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचे केले कौतुक
Posted On:
25 SEP 2023 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आपल्या क्रिकेट संघाची ही खरोखरच अद्वितीय कामगिरी आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे संपूर्ण देश आनंदित आहे. आपल्या कन्यांनी त्यांचे नैपुण्य, धैर्य, कौशल्य आणि संघभावना यांच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही आपला तिरंगा फडकवत ठेवला आहे. तुमच्या या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन.
असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960574)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam