पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभेमध्‍ये राज्यघटना (एकशे अठ्ठावीसावी सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर झाल्याचे पंतप्रधानांनी केले स्वागत

Posted On: 20 SEP 2023 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राज्यघटना (एकशे अठ्ठावीसावी  सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केल्याचे स्वागत केले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्‍यमावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की -

"राज्यघटना(एकशे अठ्ठाविसावी दुरुस्ती) विधेयक, 2023 लोकसभेत अशा अभूतपूर्व पाठिंब्याने मंजूर झाल्यामुळे आनंद झाला. या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या सर्व पक्षांच्या खासदारांचे मी आभार मानतो.

‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हा एक ऐतिहासिक कायदा आहे.  यामुळे महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळेल आणि आपल्या राजकीय प्रक्रियेत महिलांचा वाढणारा सहभाग त्यांना अधिक सक्षम करेल.

 

 

R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1959423) Visitor Counter : 328