महिला आणि बालविकास मंत्रालय

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नामांकन अर्ज सादर करता येणार

Posted On: 13 SEP 2023 11:49AM by PIB Mumbai

महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी आपल्या मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार , क्षमता, उमेद आणि उत्साहाचा  गौरव करण्यासाठी  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे  (पीएमआरबीपी )  आयोजन करते.

कोणतेही बालक जे भारतीय नागरिक आहे आणि भारतात राहणारे आहे आणि ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त नाही (अर्ज/नामांकन मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार) त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज पाठवता येईल.

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्थात https://awards.gov.in वर नामांकन अर्ज  सादर  करण्याची अंतिम तारीख 15.09.2023 आहे.

***

Jaydevi PS/SBC/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956834) Visitor Counter : 157