पंतप्रधान कार्यालय
तुर्कियेच्या राष्ट्र्पतींसमवेत पंतप्रधानांची बैठक
Posted On:
10 SEP 2023 8:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने तुर्कियेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली.
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, नागरी विमान वाहतूक आणि नौवहन यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या संभाव्यतेबाबत त्यांनी चर्चा केली.
राष्ट्रपती एर्दोगन यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. फेब्रुवारी 2023 मध्ये तुर्कीये येथे झालेल्या भूकंपानंतर 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत तातडीने मदत पुरवल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले.
राष्ट्रपती एर्दोगान यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दलही पंतप्रधानांचे अभिनंदन केले आणि सूर्याच्या दिशेने झेपावलेल्या आदित्य मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956174)
Visitor Counter : 191
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam