पंतप्रधान कार्यालय
नायजेरिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधानांची भेट
Posted On:
10 SEP 2023 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 सप्टेंबर 2023
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 समूहाच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने आज 10 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायजेरिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती बोला अहमद टीनुबु यांची भेट झाली.
भारताची जी-20 अध्यक्षता यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती टीनुबु यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. आफ्रिकी महासंघाला जी-20 समूहाचे स्थायी सदस्यत्व मिळेल याची सुनिश्चिती केल्याबद्दल तसेच ग्लोबल साउथ देशाच्या हितांना या मंचावर अधिक प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार देखील मानले.
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण,कृषी, भरड धान्ये, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान तसेच क्षमता निर्मिती यांसह द्विपक्षीय सहकार्यविषयक विस्तृत घटकांवर दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956141)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam