पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मॉरीशसच्या पंतप्रधानांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2023 7:56PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांची भेट घेतली. जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगन्नाथ सध्या भारत भेटीवर आले आहे.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“पंतप्रधान @KumarJugnauth यांच्याशी माझी अत्यंत चांगली भेट झाली. हे वर्ष भारत आणि मॉरीशस यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे वर्ष आहे कारण या वर्षी दोन्ही देशांच्या दरम्यान असलेल्या राजकीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या भेटीत आम्ही पायाभूत सुविधा, फिनटेक, संस्कृती आणि यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. त्याचसोबत, जगाच्या दक्षिणेकडील देशांचे म्हणणे अधिक उत्तमरीत्या जगासमोर मांडण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा देखील यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.”
पंतप्रधान कार्यालयातर्फे देखील एक्स मंचावर पुढील संदेश पाठवण्यात आला आहे:
“पंतप्रधान @narendramodi यांनी भारताच्या ‘सागर’ संकल्पनेतील अविभाज्य आणि महत्त्वाचा भागीदार असलेल्या मॉरीशस या देशाचे पंतप्रधान @KumarJugnauth यांची भेट घेतली. भारत आणि मॉरीशस यांच्यात असलेल्या राजकीय संबंधांचे हे 75 वे वर्ष आहे, याचे औचित्य साधून दोन्ही नेत्यांनी अत्यंत उत्साहाने या देशांच्या दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याची पोचपावती दिली.”
***
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1955657)
आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam