पंतप्रधान कार्यालय
शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांना केले अभिवादन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
05 SEP 2023 9:12AM by PIB Mumbai
आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत शिक्षकांचे दृढनिश्चयी समर्पण आणि प्रभाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन केले आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी काल शिक्षकांसोबत झालेल्या संवादातील ठळक मुद्देही सामायिक केले आहेत.
पंतप्रधान X पोस्टमध्ये म्हणाले;
''आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. #TeachersDay च्या निमित्ताने, आपण त्यांना त्यांच्या दृढनिश्चयी समर्पणाबद्दल आणि थोर प्रभावासाठी सलाम करु या. डॉ. एस. राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.
काल शिक्षकांशी झालेल्या संवादाचे हे ठळक मुद्दे...
***
Sonal T/Sonali K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1954786)
Visitor Counter : 170
Read this release in:
Manipuri
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam