कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी संशोधन आणि शिक्षण विभागातर्फे 4 ते 6 सप्टेंबर 2023 दरम्यान हैदराबाद येथे ‘हवामान अनुकूल शेती’ या विषयावर जी-20 तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन


कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, शोभा करंदलाजे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात घेतला भाग; कार्यशाळेतील शिफारशींमुळे हवामानास अनुकूल शेती साध्य करण्यासाठी दिशा मिळेल, असा विश्वास केला व्यक्त

Posted On: 04 SEP 2023 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2023

 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्यावतीने (डीएआरई), 4-6 सप्टेंबर 2023 दरम्यान हैदराबाद येथे “हवामान अनुकूल शेती” या विषयावर जी 20 तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणा-या  आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर प्रकाश टाकण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांना  एकत्र आणणे, हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध देशांकडे असणारी  कौशल्ये आणि क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य आणि माहितीची  देवाणघेवाण करण्‍यावर भर देणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे.

या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. यावेळी कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री  शोभा करंदलाजे उपस्थित होत्या.

कृषी हे सर्वात संवेदनशील क्षेत्र असल्याचे शोभा करंदलाजे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.  हवामान बदलाचा मोठा प्रभाव  जी 20 राष्ट्रे अनुभवत आहेत. या  कार्यशाळेतून मान्यवर वक्त्यांकडून  आलेल्या शिफारशींमुळे हवामान-अनुकूल  शेती साध्य करण्यासाठी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954680) Visitor Counter : 195