इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन हे नवी दिल्लीतील 18 व्या जी-20 शिखर परिषदेचे प्रमुख आकर्षण असेल
भारताच्या अध्यक्षतेखालील एका ऐतिहासिक घडामोडीत भविष्यातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेला कसा प्रभावीपणे आकार द्यायचा यावर जी-20 ने साधली महत्त्वपूर्ण सहमती
प्रतिनिधी अनुभवणार सुखकर जीवनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा आनंददायी वापर
आधार, युनिफाइड पेमेंट इंटरफेस, डिजिलॉकर, दीक्षा, भाषिनी, ओएनडीसी, ई-संजीवनी आदी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संपूर्ण समाजावरील प्रभाव दर्शवणार
डिजिटल परिवर्तनाच्या यशाचे दर्शन घडवणार डिजिटल इंडिया प्रवास
Posted On:
04 SEP 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2023
गेल्या वर्षभरात मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि नागरी संस्थांदरम्यान झालेल्या जी 20 प्रक्रिया आणि बैठकांची सांगता 18 व्या जी-20 राष्ट्र प्रमुखांच्या शिखर परिषदेने होणार असून याचे आयोजन करण्यासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्ली शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी जी 20 नेत्यांचे घोषणापत्र स्वीकारले जाईल, ज्यात संबंधित मंत्रिस्तरीय आणि कार्यगटाच्या बैठकीदरम्यान चर्चा झालेल्या आणि सहमती झालेल्या प्राधान्यांप्रति नेत्यांची वचनबद्धता नमूद केली जाईल. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 9 - 10 सप्टेंबर 2023 दरम्यान जी 20 शिखर परिषद होणार आहे.
जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन लखनौ, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरू येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यशस्वीपणे केले. बंगळुरूमध्ये जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीने त्याची सांगता झाली. या बैठकींचे मुख्य निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत:
- भारताच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करण्यासाठी एक भविष्यातील आघाडी, जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भांडार, सहाय्यक व्यवसायांसाठी उच्च-स्तरीय तत्त्वे, डिजिटल कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करण्यासाठी आराखडा, डिजीटल अप-स्किलिंग आणि री-स्किलिंग कार्यक्रमाची रचना आणि सुरुवात करण्यासाठी टूलकिट आणि डिजिटली-कुशल प्रतिभेला प्रोत्साहन देणारे व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलन्स यासारख्या आवश्यक बाबींचा समावेश असलेल्या निष्कर्षांबाबत जी 20 ची सर्वसहमती
- संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाबरोबर भागीदारीत जी-20 भारतीय अध्यक्षतेच्या ‘ऍक्सिलरेटिंग द एसडीजी थ्रू डीपीआय’ आणि ‘द DPI प्लेबुक’ या दोन ज्ञान वर्धक पुस्तिकांचे प्रकाशन ज्याचे उद्दिष्ट इतर देशांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात मदत करणे हे आहे.
- मोठ्या लोकसंख्येसाठी लागू केलेल्या यशस्वी डिजिटल उपायांचा पोर्टफोलिओ असलेल्या इंडिया स्टॅक बाबत सहकार्य आणि सामायिकरणासाठी सहा देशांसोबत सामंजस्य करार
नवी दिल्लीतील 18 व्या जी-20 शिखर परिषदेचे एक प्रमुख आकर्षण म्हणून डिजिटल इंडिया एक्सपीरियंस झोन उभारण्यात येत आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भारतात मोठ्या लोकसंख्येसाठी लागू केलेल्या डिजिटल परिवर्तनाच्या यशाची जी - 20 प्रतिनिधींना प्रत्यक्ष ओळख करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन आणि इंटरनॅशनल मीडिया सेंटर
देशात डिजिटल पायाभूत सुविधा लागू करण्यासंबंधी अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी, जागतिक हितधारकांना मोठ्या आणि पुन्हा पुन्हा राबवता येतील अशा प्रकल्पांबाबत माहिती करून देण्यासाठी तसेच अभ्यागतांना तंत्रज्ञानाचे सामर्थ्य अनुभवण्याची अनोखी संधी देण्यासाठी,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय प्रगती मैदानावरील हॉल क्र. 4 आणि हॉल क्र 14 मध्ये दोन अत्याधुनिक डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोनची उभारणी करत आहे.
या प्रदर्शनाच्या आयोजनामागे असलेले तत्व म्हणजे जागतिक दर्जाच्या उपक्रमांचे प्रदर्शन करणे. यामध्ये पुढील गोष्टी असतील. -
- जीवनमान सुलभता
- व्यवसाय सुलभता
- प्रशासन सुलभता
डिजिटल इंडिया ‘एक्सपिरियन्स झोन’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना आहे, जो डिजिटल इंडियाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांबद्दल ज्ञान आणि अंतर्दृष्टीने परिपूर्ण आहे. आधार, डिजीलॉकर, यूपीआय, ईसंजीवनी, दीक्षा, भाषिनी आणि ओएनडीसी हे सात प्रमुख उपक्रम यासाठी निवडण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून ‘डीपीआय’च्या अंमलबजावणीतील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन अभ्यागतांना भारतातील ‘डीपीआय रिपॉझिटरीज एक्सप्लोर’ करण्यासाठी आणि जागतिक समुदायाला सुधारणांबाबत एक नवीन दृष्टी देणारा अनुभव असेल.
‘आधार फेस ऑथेंटिकेशन सॉफ्टवेअर’ चे प्रात्यक्षिक केले जाणार असून, त्याचा उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच यूपीआय विषयीच्या प्रदर्शनातून पाहुण्यांना जगभरातील यूपीआयची विविध ऍप्लिकेशन्स शोधता येतील. इतकेच नाही तर, अभ्यागत वस्तू खरेदी करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करू शकतील. आणि नाममात्र पेमेंट देवून ते विनाव्यत्यय व्यवहार करू शकतील.
भारताच्या डिजिलॉकरच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दल अतिथी जाणून घेऊ शकणार आहेत. तसेच शिक्षण, वित्त आणि बँकिंग, प्रवास, वाहतूक, स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट), कायदा आणि न्यायव्यवस्था यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात आणि कार्यक्षमता वाढवण्यामध्ये डिजिटल क्षेत्राची भूमिका स्पष्ट दिसून येईल.
ई-संजीवनी प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे हृदयचिकित्सा, मानसिक आरोग्य, नेत्रचिकत्सा अशा विविध क्षेत्रांतील डॉक्टर ऑनलाइन सल्ला देण्यासाठी आणि अभ्यागतांना ई-प्रिस्क्रिप्शनसह रीअल-टाइम आरोग्य विश्लेषण आणि सल्ला देण्यासाठी उपस्थित असतील.
दीक्षा प्रदर्शनामध्ये पाहुण्यांना त्यावर उपलब्ध शैक्षणिक संसाधनांची संपत्ती जाणून घेण्याची अनुमती असेल. भाषिनी प्रदर्शनात, अभ्यागतांना सर्व भारतीय भाषांमध्ये तसेच संयुक्त राष्ट्राच्या सहा भाषांमध्ये रिअल-टाइम ‘स्पीच-टू-स्पीच’ भाषांतर कसे होते, याचा अनुभव घेता येईल. यामध्ये परस्परसंवादाची सोय करून, ‘जुगलबंदी’ ‘टेलिग्राम बॉट’ च्या माध्यमातून अभ्यागतांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत प्रश्न विचारण्याची आणि संवाद साधण्याची परवानगी असेल.
डिजिटल इंडियाचा प्रवासाचा अनुभव देणारे अनोखे भव्य प्रदर्शन तयार केले असून अतिथी मंडळींना 2014 पासून डिजिटल इंडियाने गाठलेले प्रमुख टप्पे दाखवण्यात येणार आहेत. त्याच्याच जोडीला व्हर्च्युअल रिअॅलिटी डिजिटल द्वारे, डीपीआयची तत्त्वे आणि उत्क्रांती पाहता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये डिजिटल ट्री’ हा उपक्रम डिजिटल इंडियाअंतर्गत पहायला मिळेल.
ओपन नेटवर्क फॉर कॉमर्स (ओएनडीसी) मंच मोठ्या प्रमाणात डिजिटल विक्रेते, ग्राहक आणि नेटवर्क प्रदाते यांच्यात कसा समन्वय साधतो ते इथे अनुभवता येईल. G.I.T.A. अॅप्लिकेशनने एक व्यासपीठ प्रदान करण्यात येऊन पाहुण्यांना पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून संरेखित जीवनाविषयक प्रश्नांची उत्तरे मिळवता येतील.
‘डिजिटल इंडिया एक्सपिरिअन्स झोन’ मध्ये परस्पर संवाद साधणारे फलक , व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि त्याही पुढच्या टप्प्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या झोनमध्ये येणा-या अतिथींच्या वयोगटाचा विचार करून सर्व वयातील अभ्यागतांना काहीतरी वेगळे दाखवण्याची प्रतिबद्धता दिसून येते. यासाठी तशीच सामग्री सुनिश्चित केली आहे. प्रत्येक ‘इंस्टॉलेशन’मुळे त्याच्या लक्ष्यित प्रेक्षकांबरोबर संबंध प्रस्थापित होईल, अशी रचना करण्यात आली आहे.
* * *
S.Kakade/Sushma/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1954653)
Read this release in:
Hindi
,
Punjabi
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam