पंतप्रधान कार्यालय
संसदीय सांस्कृतिक सोहळा हा प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठीचा एक उत्तम उपक्रम आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
02 SEP 2023 8:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की संसदीय सांस्कृतिक सोहळा हा असा एक उत्तम उपक्रम आहे ज्यात वेगवेगळ्या संसदीय मतदारसंघातील सामान्य लोकांना त्यांच्या प्रतिभेचे सादरीकरण करण्याची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. या उपक्रमात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन देण्याची विनंती देखील त्यांनी सर्वांना केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“वेगवेगळ्या संसदीय मतदारसंघातील लोकांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी देऊ करणारा संसदीय सांस्कृतिक सोहळा हा एक उत्तम उपक्रम आहे. भाजपाचे खासदार या कार्यक्रमाच्या आयोजनात अत्यंत उत्साहाने भाग घेत आहेत. याच शृंखलेत, मी देखील, माझ्या काशी मतदारसंघात एक नम्र प्रयत्न केला आहे. माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की तुम्ही यात सहभागी झालेल्यांना जरुर प्रोत्साहित करा.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954439)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam