पंतप्रधान कार्यालय
इथियोपिया प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
24 AUG 2023 11:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथियोपिया प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांची, 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे, 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजना दरम्यान भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी विकास भागीदारी आणि क्षमता बांधणी, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण सहकार्य, माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान, कृषी, तरुणांचे कौशल्य आणि लोकांच्या परस्पर संपर्कासह महत्त्वाच्या क्षेत्रांवर फलदायी चर्चा केली. त्यांनी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.
इथिओपियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांचे अभिनंदन केले. व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषदेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान अबी अहमद यांचे कौतुक केले.
पंतप्रधान अबी अहमद यांनी इथियोपियाला ब्रिक्स कुटुंबात सामील होण्यासाठी भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले तसेच चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. चांद्रयान मोहीमेचे यश इथिओपिया आणि ग्लोबल साउथसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे इथिओपियाचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे.
***
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1952040)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada