गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सीआरपीएफ समूह  केंद्रामध्ये  गृह मंत्रालयाच्या  अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत 4 कोटीवे रोपटे लावले

Posted On: 18 AUG 2023 4:53PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल समूह केंद्रामध्ये गृह मंत्रालयाच्या  अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत 4 कोटीवे रोपटे लावले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 8 वेगवेगळ्या परिसरामध्ये  165 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 15 नव्या इमारतींचेही अमित शाह यांनी उद्घाटन केले.केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी), सेवा निवड मंडळ (एसएसबी)., सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि आसाम रायफल्सचे महासंचालक यावेळी उपस्थित होते.

सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (सीएपीएफ ) आजचा दिवस महत्त्वाचा आहे.   तीन वर्षांपूर्वी डिसेंबर 2023 पर्यंत 5 कोटी झाडे लावण्याचा आणि झाडे लावून दरी भरून काढल्यानांतरती मोठी  झाल्यावर, आपण त्यांना जगाला समर्पित करण्याचा  संकल्प करण्यात आला होता, असे आपल्या  भाषणात अमित शहा यांनी सांगितले. डिसेंबर 2023 पर्यंत 5 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास   शहा यांनी व्यक्त केला.यावर्षी 1 कोटी 50 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट प्रगतीपथावर असून, आजपर्यंत एकूण 4 कोटी रोपांची लागवड करण्यात आली आहे.  5 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

5 कोटी झाडे लावण्याचे 'अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान' म्हणजे पर्यावरण रक्षणाचा महाकुंभ आहे, असे अमित शहा म्हणाले. आपल्या सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातले   जवान आपल्या धैर्याने, त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रमाने देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाच्या  सीमांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत, असे गौरोवोद्गार त्यांनी काढले. देशाची अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, सीमा सुरक्षा आणि सीमेवर वसलेल्या पहिल्या गावांना सार्वजनिक सुविधा सुनिश्चित करण्याशिवाय  केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आता   वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी अभूतपूर्व कार्य करत आहे, असे ते म्हणाले.

झाडे लावताना दोन बाबींचा विचार केला जातो. त्या म्हणजे प्रथम, लावलेल्या झाडांना दीर्घायुष्य लाभले पाहिजे  आणि दुसरे म्हणजे ती झाडे पिंपळ , वड , कडुनिंब,जांभूळ   आणि अन्य झाडांप्रमाणे  जास्तीत जास्त ऑक्सिजन  पुरवणारी असावीत, असे शहा यांनी सांगितले.  ही झाडे 60-100% पर्यंत ऑक्सिजन उत्सर्जित करतात आणि ही झाडे  वर्षानुवर्षे पृथ्वीच्या संवर्धनासाठी योगदान देतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांमध्ये भारताचा विकास करण्याचे आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी  कार्य  केल्यामुळे जगामध्ये देशाचे स्थान बळकट  झाले आहे, असे शहा यांनी सांगितले. आपला वारसा आणि संस्कृतीने नेहमीच पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन दिले आहे आणि आपल्या भावना आणि कृतीतून आपण नेहमीच पर्यावरणाचे संवर्धन सुनिश्चित केले आहे, असे ते म्हणाले.

आज, आमच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांनी जे अशक्य वाटत होते ते पूर्ण केले आहे. देशासाठी सुरक्षा आणि शौर्य हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे  मूल्य असल्याने ते वृक्षारोपण देखील त्यांचे मूल्य म्हणून  स्वीकारतील  असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950230) Visitor Counter : 118