पंतप्रधान कार्यालय
पारंपरिक कलाकौशल्याचे काम करणाऱ्यांना लाभ देण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केली ‘विश्वकर्मा’ योजना
13000 ते 15000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक तरतुदीने योजना सुरू होणार
13.5 कोटी गरीब देशवासी आणि महिला गरिबीच्या शृंखलेतून मुक्त झाले आहेत आणि नवमध्यम वर्गात दाखल झाले आहेत
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2023 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
77व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही दिवसात ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. पारंपरिक कलाकौशल्याचे काम करणाऱ्यांना लाभ देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
“येत्या काही दिवसात, आम्ही विश्वकर्मा जयंतीला पारपंरिक कलाकौशल्याचे काम करणाऱ्यांना विशेषतः ओबीसी समुदायातील कारागीरांना लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करत आहोत. विणकर, सोनार, लोहार, लॉन्ड्री कामगार, नाभिक आणि अशा कुटुंबांचे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यात येईल. 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक तरतुदीने ही योजना सुरू होईल.”, असे पंतप्रधान म्हणाले.
त्यापूर्वी आपल्या भाषणात मोदी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले, “या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 13.5 कोटी गरीब देशवासी आणि महिला गरिबीच्या शृंखलेतून मुक्त झाले आहेत आणि नवमध्यम वर्गात दाखल झाले आहेत.”
पंतप्रधानांनी 13.5 कोटी लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हात देणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने पीएम स्वनिधीच्या माध्यमातून फेरीवाल्यांना 50,000 कोटी रुपये आणि पीएम किसान सम्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2.5 लाख कोटी रुपये जमा करण्याचा समावेश होता.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1949027)
आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam