पंतप्रधान कार्यालय
शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रूपये असताना, शेतकऱ्यांना 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जातो – पंतप्रधान
Posted On:
15 AUG 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी युरियावरील अनुदान म्हणून 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर प्रति पिशवी 3,000 रुपये किमतीचा युरिया, शेतकऱ्यांना प्रति पिशवी 300 रुपये, इतक्या स्वस्त दराने दिला जातो. सरकारने युरिया अनुदान म्हणून 10 लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला माहिती दिली की, युरिया जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना 3,000 रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. “ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत 3,000 रूपयांनी विकतात,तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकर्यांना 300 रूपये दराने विकते. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत आहे.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949016)
Visitor Counter : 156
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam