ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्राने आरोग्य आणि तंदुरुस्ती या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित व्यक्ती तसेच प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे केली जारी


प्रमाणित वैद्यकीय व्यवसायी आणि आरोग्य तसेच तंदुरुस्ती तज्ञांनी ते प्रमाणित आरोग्य/ तंदुरुस्ती तज्ञ आणि वैद्यकीय व्यवसायी आहेत हे जाहीर करणे आवश्यक

नामांकित व्यक्ती आणि प्रभावी व्यक्ती तसेच आभासी प्रभावकांनी स्वत:ला आरोग्य तज्ञ किंवा वैद्यकीय व्यवसायी म्हणून सादर करताना स्पष्ट अस्वीकरण प्रदान करणे आवश्यक

Posted On: 10 AUG 2023 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने, आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे 9 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या, दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींच्या समर्थनाच्या प्रतिबंधासाठीची मार्गदर्शक तत्त्वे, 2022 तसेच 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली मार्गदर्शक पुस्तिका "समर्थन माहिती!" चा एक महत्त्वाचा विस्तार आहेत.

आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) तसेच भारतीय जाहिरात मानक परिषद (ASCI) यांच्यासह सर्व भागधारकांबरोबर तपशीलवार चर्चा केल्यानंतर, आरोग्य आणि तंदुरुस्ती क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, प्रभावी व्यक्ती आणि आभासी प्रभावकांसाठी ही अतिरिक्त प्रभावशाली मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात आली आहेत.

दिशाभूल करणार्‍या जाहिराती, अप्रमाणित दाव्यांना सामोरे जाणे तसेच आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे हे या अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रमाणपत्रे मिळवलेले प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिक तसेच आरोग्य आणि तंदुरुस्ती तज्ञांनी आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देताना, आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबतची उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करताना किंवा आरोग्य-संबंधित कोणतेही दावे करताना, ते प्रमाणित आरोग्य/ तंदुरुस्ती तज्ञ आणि वैद्यकीय व्यवसायी आहेत हे जाहीर करणे आवश्यक आहे.

प्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली आणि आभासी प्रभावकर्त्यांनी उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करताना किंवा कोणतेही आरोग्य-संबंधित दावे करताना, स्वत:ला आरोग्य तज्ञ किंवा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून सादर करताना, माहिती सामायिक करताना, स्पष्ट अस्वीकरण प्रदान करणे आवश्यक आहे ज्यानुसार प्रेक्षकांना स्पष्टपणे समजेल की त्यांचे समर्थन पर्याय म्हणून पाहिले जाऊ नये. 

खाद्यपदार्थ आणि पोषक खाद्यपदार्थ (न्यूट्रास्युटिकल्स), रोग प्रतिबंधक, उपचार किंवा इलाज, वैद्यकीय परिस्थिती, बरे होण्याच्या पद्धती किंवा रोग प्रतिकारशक्ती वाढवणे इ. यासारख्या विषयांवर बोलतांना किंवा दावे करताना हे प्रकटीकरण किंवा अस्वीकरण आवश्यक आहे.  समर्थन, जाहिराती किंवा आरोग्य-संबंधित प्रतिपादन करताना हे अस्वीकरण प्रदर्शित करायला हवे.

'पाणी प्या आणि हाइड्रेटेड राहा', 'नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा', 'एकाच जागी जास्त वेळ बसणे आणि जास्त स्क्रीन पाहणे कमी करा', 'पुरेशी झोप घ्या', 'लवकर बरे होण्यासाठी हळद घातलेले दूध प्या', हानिकारक अतिनील किरणांपासून बचावासाठी दररोज  'सनस्क्रीनचा उपयोग करा', 'केसांच्या चांगल्या वाढीसाठी तेलाचा वापर करणे' आदि सामान्य आरोग्य विषयक हितकारक सल्ले जे विशिष्ट उत्पादने किंवा  सेवांशी सबंधित नाहीत अथवा विशिष्ट आरोग्य स्थिती, परिणामांना लक्ष्य करत नाहीत, त्यांना या नियमातून सूट दिली आहे. 

स्वतःला आरोग्यतज्ञ किंवा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून सादर करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती आणि आभासी प्रभावशाली लोकांनी आपले वैयक्तिक विचार आणि व्यावसायिक सल्ले यात स्पष्टपणे अंतर ठेवावे तसेच कोणत्याही ठोस तथ्यांशिवाय विशिष्ट आरोग्य विषयक दावे करु नयेत हे महत्वाचे आहे. व्यावसायिक वैद्यकीय सल्ला आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करण्यास प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्याची शिफारस केली जाते.

डीओसीए, या मार्गदर्शक तत्त्वांचे सक्रियपणे निरीक्षण आणि अंमलबजावणी करेल.  उल्लंघन केल्यास ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि कायद्यातील इतर संबंधित तरतुदींनुसार दंड होऊ शकतो.

ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि निष्पक्ष तसेच पारदर्शक बाजारपेठेला विशेषत: वाढत्या प्रभावशाली डिजिटल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. या मार्गदर्शक तत्त्वामुळे उद्योग क्षेत्र अधिक मजबूत होईल आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होईल.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक माहितीसाठी, भेट द्या:

https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/fileuploads/latestnews/Additional%20Influencer%20Guidelines%20for%20Health%20and%20Wellness%20Celebrities%2C%20Influencers%20and%20Virtual%20Influencers.pdf

 

Jaydevi PS/S.Mukhedkar/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1947467) Visitor Counter : 142