पंतप्रधान कार्यालय
डिजिटल आरोग्य सुविधांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
05 AUG 2023 9:29AM by PIB Mumbai
कोट्यवधी लोकांना आरोग्यासंबंधित डिजिटल सुविधांचा पूर्ण लाभ मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये माहिती दिली की, असंसर्गजन्य आजारासाठींच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत एनसीडी (NCD) पोर्टलच्या माध्यमातून 5 कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती (ABHA) तयार करण्यात आली आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
खूप चांगली माहिती आहे! देशभरातल्या आपल्या गरीब बंधू-भगिनींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात हीच आमची प्राथमिकता राहिलेली आहे.ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, डिजिटल स्वरूपात मिळणाऱ्या या सुविधांमुळे कोट्यवधी लोकांपर्यंत या सुविधांचा चांगला लाभ पोहोचत आहे.
***
JPS/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1945998)
Visitor Counter : 129
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam