पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दल भारतीय महिलांच्या कंपाऊंड टीमचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 05 AUG 2023 9:30AM by PIB Mumbai

बर्लिन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल भारतीय महिलांच्या कंपाउंड टीमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आमच्या कंपाऊंड महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले असून हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या विजेत्यांचे अभिनंदन ! त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले आहे .”

***

JPS/SushamaSushama/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1945988) आगंतुक पटल : 313
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam