पंतप्रधान कार्यालय
देशाच्या कानाकोपऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
Posted On:
02 AUG 2023 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023
भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातील अनेक जिल्ह्यांमधे तीन लाखांपेक्षा जास्त ठिकाणी, 5-जी सेवेची यशस्वी स्थापना होणे, ही घटना भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील मैलाचा दगड ठरली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5-जी व्यवस्था ठरलेल्या भारताच्या कामगिरीविषयी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“डिजिटल संपर्क व्यवस्थेत भारत पुढेच जातो आहे ! देशातील अनेक जिल्ह्यांमधे 3 लाखांपेक्षा अधिक जागी 5-जी सेवा लागू होणे, ही आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रवासातील एक मोठी कामगिरी आहे. अत्यंत जलद गतीने होत असलेली, 5-जी ची अंमलबजावणी, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवत, अनेकांच्या जीवनात परिवर्तन करण्याची आणि प्रगतीला चालना देण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे.”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945273)
Visitor Counter : 157
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam