खाण मंत्रालय
देशातील खनिज उत्पादनात मे 2023 मध्ये 6.4% वाढ
एप्रिल- मे 2022-23 दरम्यान एकूण वाढ 5.8 % नोंदवली गेली
महत्त्वाच्या दहा खनिज उत्पादनात सकारात्मक वाढ
Posted On:
25 JUL 2023 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2023
मे - 2023 महिन्यासाठी (आधार 2011-12=100) खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 128.1 वर पोहोचला जो इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार मे 2022 मधील पातळीच्या तुलनेत 6.4% जास्त आहे. त्याच वेळी, एप्रिल - मे, 2022-23 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढ 5.8 % इतकी आहे.
मे - 2023 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी पुढील प्रमाणे होती: कोळसा 762 लाख टन, लिग्नाइट 35 लाख टन, पेट्रोलियम (क्रूड) 25 लाख टन, लोह खनिज 253 लाख टन, चुनखडी 387 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2838 दशलक्ष घन. मी., बॉक्साइट 2386 हजार टन, क्रोमाईट 372 हजार टन, तांबे कॉन्क. 9 हजार टन, शिसे (लिड कॉन्सन्ट्रेट) 33 हजार टन, मॅंगनीज खनिज 329 हजार टन, झिंक कॉन्क. 133 हजार टन, फॉस्फोराईट 140 हजार टन, मॅग्नेसाइट 11 हजार टन आणि सोने 97 किलो.
मे 2022 च्या तुलनेत मे 2023 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये यांचा समावेश आहे: मॅंगनीज धातू (40.4%), मॅग्नेसाइट (28.2%), तांबे कॉन्क (24.4%), क्रोमाइट (16.3%),लोह धातू (13.6%), चुनखडी (10.1%), शिसे (9.7%), कोळसा (7%), बॉक्साईट (4.8%) आणि झिंक कॉन्क (2.9%).
नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये यांचा समावेश आहे: नैसर्गिक वायू (U)(0.3%), पेट्रोलियम (क्रूड) (-1.9%), फॉस्फोराईट (-6.3%) आणि लिग्नाइट (-17.7%).
S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942410)
Visitor Counter : 162