पंतप्रधान कार्यालय
25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत (2023) 27 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रीडापटूंचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2023 12:17PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 27 पदके जिंकली आहेत, जी कोणत्याही विजेतेपद स्पर्धेच्या एका सत्रात परदेशी भूमीवरील सर्वोच्च पदक संख्या आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा 2023 मध्ये भारतीय क्रीडापटूंच्या चमूची ही उत्कृष्ट कामगिरी आहे! आपल्या खेळाडूंनी 27 पदके जिंकली, जी कोणत्याही विजेतेपद स्पर्धेतील परदेशी भूमीवरील सर्वाधिक पदकसंख्या आहे. या कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन. अशा कामगिरीचा अभिमान वाटतो.”
***
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1940128)
आगंतुक पटल : 369
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu