गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्ली येथे ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरच्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन
परिषदेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, सर्व राज्यांच्या एएनटीएफच्या समन्वयाने, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो द्वारे देशातील विविध भागांमध्ये 1,44,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात येणार
Posted On:
16 JUL 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्ली येथे ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, सर्व राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या समन्वयाने अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो द्वारे देशातील विविध भागांमध्ये 1,44,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत.
विविध राज्यांच्या विविध कायदा अंमलबजावणी संस्थांद्वारे एकूण 1,44,122 किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले जातील , यामध्ये आसाममधील 1,486 किलोग्रॅम, चंदीगडमधील229 किलोग्रॅम, गोव्यात 25 किलोग्रॅम, गुजरातमधील 4,277 किलोग्रॅम, हरियाणामधील 2,458 किलोग्रॅम, जम्मू आणि काश्मीरमधील 4,069 किलोग्रॅम, मध्य प्रदेशमधील 1,03,884 किलोग्रॅम, महाराष्ट्रमधील 159 किलोग्रॅम, त्रिपुरामधील 1,803 किलोग्रॅम आणि उत्तर प्रदेशमधील 4,049 किलोग्रॅमचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अंमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध ‘शून्य सहिष्णुता ’ धोरण स्वीकारले आहे. 1 जून, 2022 पासून 15 जुलै 2023 पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे सर्व प्रादेशिक विभाग आणि राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या सर्व प्रादेशिक विभागांनी एकत्रितपणे सुमारे 9,580 कोटी रुपये मूल्य असलेले सुमारे 8,76,554 किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले असून ते निर्धारित उद्दिष्टाच्या 11 पट अधिक आहे. सोमवारी आणखी अंमली पदार्थ नष्ट केल्यावर , एका वर्षात नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे एकूण प्रमाण सुमारे 10 लाख किलोग्रॅमवर पोहोचेल, ज्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंमली पदार्थ मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही मोहीम सक्रियपणे आणि त्याच उत्साहाने सुरू राहील.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939950)
Visitor Counter : 197