पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

Posted On: 15 JUL 2023 6:54AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर खाजगी आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली.

उभय नेत्यांनी संरक्षण व सुरक्षा, नागरी आण्विक, विज्ञान - तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, अंतराळ, हवामान आणि लोकांचे परस्परांशी थेट संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा केली.


भारताचे जी20 अध्यक्षपद, हिंद-प्रशांत क्षेत्र व परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक तसेच, जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

भारत आणि फ्रान्स यांच्या भविष्यवेधी धोरणात्मक भागीदाराचा पट मांडणाऱ्या "हॉरीझॉन 2047: चार्टिंग द फ्युचर ऑफ इंडिया-फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप" हा महत्त्वाकांक्षी परिणामकारक दस्तऐवजही स्वीकारण्यात आला.

जी20 नेत्यांच्या सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे नवी दिल्लीत स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले

***

Shilpa P/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939687) Visitor Counter : 136