गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महापौर शिखर परिषदेसाठी G20 च्या U20 प्रतिबद्धता गटाची 7-8 जुलै रोजी होणार बैठक



आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या U20 शिखर परिषदेपैकी एक असलेल्या या परिषदेला महापौर, उपमहापौर आणि शहर अधिकारी आणि ज्ञान भागीदारांसह 500 हून अधिक जण उपस्थित राहणार

Posted On: 05 JUL 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर या शहरांमध्ये 7-8 जुलै 2023 रोजी जगभरातील 57 शहरे आणि भारतातील 35 शहरांमधील प्रतिनिधी आणि सहभागी एकत्र येतील. या उत्सवाची तयारी G20 अंतर्गत असलेल्या अर्बन 20 च्या सहाव्या फेरीच्या महापौर शिखर परिषदेसाठी आहे. G20 देशांमधील शहरांमध्ये चर्चा सुलभ करून, U20 हे शहरी प्राधान्यक्रमानुसार शहरांसाठी एकत्रितपणे G20 वाटाघाटींची माहिती देण्यासाठी एक व्यासपीठ स्थापन करते. सरकारी प्रतिनिधी आणि ज्ञान भागीदार यांच्याव्यतिरिक्त महापौर, उपमहापौर आणि शहर अधिकारी अशा 500 हून अधिक सहभागींसह, आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या U20 शिखर परिषदांपैकी एक होण्यासाठी सज्ज आहे.

उद्घाटन सत्र आणि G20 नेत्यांना महापौरांद्वारे U20 पत्रक   सुपूर्द करण्याव्यतिरिक्त, दोन दिवसांच्या दिनक्रमात अनेक संकल्पनात्मक सत्रे आणि ठळक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या सोहोळ्यासाठी, अहमदाबादला गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) हे नोडल मंत्रालय म्हणून, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA), U20 चे तांत्रिक सचिवालय आणि U20 संयोजक, C40 शहरे आणि UCLG (युनायटेड शहरे आणि स्थानिक सरकारे) पाठबळ देणार आहेत.

महापौर मेळाव्याचे 7 जुलै रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होईल.

शिखर परिषदेदरम्यान सहा U20 प्राधान्य क्षेत्रावरील संकल्पनात्मक सत्रांचे आयोजन केले जाईल. पर्यावरणीय जबाबदारी, हवामान वित्तपुरवठा आणि भविष्यातील शहरांवर G20 देत असलेला भर U20 च्या प्राधान्य क्षेत्रात दिसून येतो.

ही सत्रे आयोजित करण्यासाठी अनेक ज्ञान भागीदार NIUA सह सहयोग करत आहेत. यामध्ये जागतिक आर्थिक मंच (WEF), C40 शहरे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG), युनेस्को, युनिसेफ, जीआयझेड आणि आयसी एलईआय यांचा समावेश आहे.

पत्रक  हा G20 देशांमधील शहरांनी मान्यता दिलेले प्रत्येक फेरीतील U20 चर्चांचा निष्कर्ष असलेला दस्तावेज आहे. G20 शेर्पा अमिताभ कांत आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांना सहभागी महापौरांद्वारे घोषणापत्र सुपूर्द करून महापौर शिखर परिषदेचा समारोप होईल.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 1937534) Visitor Counter : 197