पंतप्रधान कार्यालय
‘सॅफ’ 2023 स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय फुटबॉल संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2023 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2023
‘एसएएफएफ’ (सॅफ) म्हणजेच साउथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय फुटबॉल संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“भारताने पुन्हा विजेतेपद पटकावले! ‘एसएएफएफ’ अजिंक्यपद 2023 स्पर्धेमध्ये ‘ब्लू टायगर्स’ ने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन. या खेळाडूंचा जिद्दीने आणि सर्वशक्तीनिशी सुरू असलेला खेळ म्हणजे, भारतीय संघाचा उल्लेखनीय प्रवास आहे. क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या खेळाडूंना ही कामगिरी प्रेरणा देत राहील.”
S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1937483)
आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam