सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील मेहसाणा येथील दूधसागर संशोधन आणि विकास संस्थेद्वारे संचालित श्री मोतीभाई आर चौधरी सागर सैनिक शाळेची दूरदृश्य प्रणालीद्बारे केली पायाभरणी

Posted On: 04 JUL 2023 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा  यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्बारे गुजरातमधील मेहसाणा येथील दूधसागर संशोधन आणि विकास संस्थेद्वारे  संचालित श्री मोतीभाई आर चौधरी सागर सैनिक शाळेची पायाभरणी केली.

मोतीभाई चौधरी सागर सैनिक शाळेची आज पायाभरणी करण्यात आली असून  ही सैनिकी  शाळा केवळ उत्तर गुजरातच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील  मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी सहज  आणि सुलभ माध्यम बनेल, असे अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले. या शाळेत शिकून  सैन्यात जाणारी मुले देशभक्ती आणि देशाच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करतील आणि जे या शाळेतून शिकून नागरी जीवन जगतील ते  देशभक्तीची संस्कृती आपल्या जीवनात रुजवतील आणि एक चांगले नागरिक बनतील असे त्यांनी सांगितले.

ही सैनिकी  शाळा ज्ञान, संरक्षण , शौर्य आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि अनेक तरुणांच्या जीवनात नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी   कार्य करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.2022-23 मध्ये 50 आणि  2023-24 मध्ये 55 छात्रसैनिकांना प्रवेश देण्यात आला आहे.या शाळेत शिकणारे युवक कठोर दिनचर्या पाळतात.भारतमातेच्या सेवेसाठी ते स्वत: ला सज्ज  करत असून  भारताला बलशाली बनवतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1937308) Visitor Counter : 149