पंतप्रधान कार्यालय

हूल दिनानिमित्त पंतप्रधानांनी आदिवासी समाजातील हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 30 JUN 2023 4:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हूल दिनानिमित्त आदिवासी समाजातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

हूल दिवसानिमित्त आदिवासी समाजातल्या वीर महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम. हा विशेष दिवस आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या सिद्धो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यांच्यासारख्या अनेक इतर पराक्रमी व्यक्तींच्या शौर्य आणि धाडसाची आठवण करून देतो. या हुतात्म्यांच्या संघर्षाची यशोगाथा देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील.

***

R.Aghor/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936436) Visitor Counter : 114