पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान, 30 जून रोजी दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात होणार सहभागी
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विद्याशाखा, संगणक केंद्र आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीचीही पंतप्रधान करणार पायाभरणी
Posted On:
28 JUN 2023 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जून 2023 रोजी दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजता दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
विद्यापीठाच्या उत्तर प्रांगणात बांधल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या संगणक केंद्र, तंत्रज्ञान विद्याशाखा आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची पायाभरणी देखील पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान करतील.
दिल्ली विद्यापीठाची स्थापना 1 मे 1922 रोजी झाली. गेल्या शंभर वर्षांत, विद्यापीठाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. विद्यापीठा अंतर्गत आता 86 विभाग, 90 महाविद्यालये, 6 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. राष्ट्र उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936061)
अभ्यागत कक्ष : 170
Read this releasein:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam