पंतप्रधान कार्यालय
इजिप्तचे ग्रँड मुफ्ती यांच्यासोबत पंतप्रधानांची बैठक
Posted On:
25 JUN 2023 5:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त दौऱ्यादरम्यान 24 जून 2023 रोजी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अल्लम यांची भेट घेतली.
ग्रँड मुफ्ती यांनी त्यांच्या भारत भेटीची आठवण सांगितली आणि भारत आणि इजिप्तमधील मजबूत सांस्कृतिक तसेच उभय देशांमधील लोकांमधील परस्पर संबंधांचा उल्लेख केला. सर्वसमावेशकता आणि बहुलवादाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांची ग्रँड मुफ्ती यांनी प्रशंसा केली.
समाजातील सामाजिक आणि धार्मिक सलोख्याशी संबंधित मुद्द्यांवर तसेच उग्रवाद आणि कट्टरतावादाचा प्रतिकार करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
इजिप्तच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत दार-अल-इफ्ता येथे भारत माहिती तंत्रज्ञानातील उत्कृष्टता केंद्र स्थापन करेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935124)
Visitor Counter : 167
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam