पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा अमेरिकेमधल्या प्रमुख व्यावसायिकांशी संवाद
Posted On:
24 JUN 2023 7:28AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉन एफ केनेडी सेंटर येथे अमेरिकेमधल्या व्यावसायिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन USISPF अर्थात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी संघाद्वारे करण्यात आले होते. अमेरिकेचे राज्य सचिव एच.ई. श्री. अँटनी ब्लिंकन हे देखील यावेळी उपस्थित होते.
भारतात सध्या होत असलेल्या सखोल परिवर्तनावर आणि विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. "हाच क्षण आहे" यावर भर देत पंतप्रधानांनी व्यावसायिकांना भारतासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील सुमारे आघाडीचे एक हजार व्यावसायिक उपस्थित होते.
***
M.Iyengar/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934991)
अभ्यागत कक्ष : 198
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam