आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे गॅरिसन ग्राउंडवर होणाऱ्या 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात उपराष्ट्रपती  15000 हून अधिक उत्साही योगप्रेमींचे नेतृत्व करतील


पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष योगाभ्यास कार्यक्रमात होणार सहभागी

या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ओशन रिंग ऑफ योग, आर्क्टिक ते अंटार्क्टिका, योग भारतमाला, योग सागरमाला आणि हर आंगन योग पाहायला मिळेल

Posted On: 20 JUN 2023 2:38PM by PIB Mumbai

 

21 जून रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखाली 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 चा राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई छगनभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि  जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि  राज्यांतील अनेक मान्यवर उपस्थित राहून योगाभ्यास करतील.

मुख्य कार्यक्रमात सुमारे 15,000 लोक सहभागी होण्याची शक्यता  आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची यावर्षीची संकल्पना वसुधैव कुटुंबकमसाठी योगअशी आहे जी भारताचा  सामाजिक-सांस्कृतिक वारसा दर्शवते.

पंतप्रधानांच्या पुढाकारामुळे गेल्या 9 वर्षांत योगाभ्यास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.  या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योगाचे नेतृत्व करतील, ज्यात योगाभ्यास प्रति आपली बांधिलकी दर्शविण्यासाठी 180 हून अधिक देश सहभागी होण्याची शक्यता आहे.  दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांसह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे . आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता द्यावी असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रांत मांडला होता. डिसेंबर 2014 मध्ये या प्रस्तावाला समर्थन देणाऱ्या ठिकाणीच होत असलेल्या या विशेष कार्यक्रमासाठी मी उत्सुक आहे. "

या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी वैशिष्ट्यपूर्ण असे ओशन रिंग ऑफ योग पहायला मिळेल ज्यात भारतीय नौदल आणि व्यापारी जहाजे वेगवेगळ्या महासागरातील मित्र देशांच्या बंदरांवर/जहाजांवर योग प्रात्यक्षिके आयोजित करतील.

आर्क्टिक ते अंटार्क्टिका पर्यंत योग हे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र सदस्य देशांबरोबरच  मुख्य रेखावृत्तावरील  आणि आसपासच्या देशांमध्ये योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आयुष मंत्रालयाबरोबर समन्वय साधत आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या समन्वयाने उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव प्रदेशांवर योगाभ्यास आयोजित करण्यात आला असून आर्क्टिकमधील भारतीय संशोधन केंद्र  हिमाद्री इथे आणि अंटार्क्टिकातील भारतीय संशोधन केंद्र भारती येथे ही योग प्रात्यक्षिके आयोजित केली जातील.

योग भारतमालाची संकल्पना आखण्यात आली असून यात भारतीय सशस्त्र दल  इंडो तिबेट सीमा पोलीस दल , सीमा सुरक्षा दल, सीमा रस्ते संघटनेसोबत योग प्रात्यक्षिकांची एक साखळी बनवतील.  योग सागरमाला मध्ये भारतीय किनारपट्टीवर योगाभ्यास पहायला मिळेल.संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आयएनएस  विक्रांतच्या फ्लाइट डेकवर योग प्रात्यक्षिके सादर केली जातील.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी देशामध्‍ये अगदी गावपातळीवर  "हर आंगन योग" म्हणजे अगदी घराघरामध्‍ये योग पोहोचवण्‍याचे उद्दिष्‍ट्य  साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी ग्राम पंचायत  सरपंचांना लिहिलेल्या पत्रात 21 जून रोजी  गावकऱ्यांसोबत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन सरपंचांना केले आहे.  तसेच आपल्या घराजवळ असलेल्या अंगणवाड्या, आरोग्य आणि कल्याण केंद्रे तसेच विविध शाळांमध्ये होणा-या योगदिनाच्या कार्यक्रमामध्‍ये सर्वजण  सामील होऊ शकतील. याशिवाय, सुमारे 2 लाख सीएससीम्हणजे सामायिक  सेवा केंद्रेराष्ट्रीय आयुष मिशन, आयुष ग्राम अंतर्गत, आयुष आरोग्य आणि निरामय केंद्रांमध्‍येही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवात ग्रामस्थ सहभागी होवू शकतात.

आयुष मंत्रालयाने आयसीसीआर म्हणजेच भारतीय संस्कृती संबंध परिषद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या  सहकार्याने MyGov.in प्लॅटफॉर्मवर "योग माय प्राइड" ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली आहे. योग दिन कार्यक्रमामध्‍ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणा-यांनी आपले "योगासन" करत असल्याचे छायाचित्र  योग्य शीर्षकासह  अपलोडकरावे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागीना तीन श्रेणींमध्ये पारितोषिके  देण्‍यात येणार आहेत. 

काम करताना तणावमुक्त होवूनताजेतवाने होवून आपल्या कामावर  पुन्हा लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे, या  उद्देशाने यावर्षी कामाच्यास्थानी वाय-ब्रेकम्हणजे योगासनासाठी ब्रेक देण्‍याची संकल्पना  आयुष मंत्रालयाने मांडली आहे. यासाठी  यावर्षी Y-break@workspaces – ‘योग इन चेअरम्हणजे खुर्चीवर बसल्या ठिकाणी योग करता येणार आहे.  भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना/विभागांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपल्या  कर्मचाऱ्यांना खुर्चीत बसून योगासन करण्यास सांगावे.

आंतरराष्‍ट्रीय योग दिन संपूर्ण सरकारी पध्‍दतीने साजरा केला जात आहे. भारत सरकारची सर्व महत्त्वाची मंत्रालये, राज्य सरकारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुख्‍य योग संस्था आणि संस्था, विद्यापीठे, सशस्त्र सेना,एनएसएस आणि एनवायके स्वयंसेवक आणि इतर भागधारक आधीपासूनच  आयडीवाय 2023 च्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. तसेच  21 जून 2023 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्‍ये  भारतीय दूतावास, संयुक्त राष्‍ट्र  सदस्य देश देखील सहभागी होतील.

***

N.Chitale/S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933670)