पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील दौसा येथे ‘प्रधानमंत्री मातृ वंदन योजना’, ‘गोद भराई’ सोहळा म्हणून साजरी करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2023 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
राजस्थानमधील दौसा येथे ‘प्रधानमंत्री मातृ वंदन योजना’ ही योजना ‘गोद भराई’ सोहळा म्हणून साजरी करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
राजस्थानमधील दौसा येथील खासदार जसकौर मीना यांनी एका ट्विटव्दारे माहिती दिली आहे, की राजस्थानमध्ये दौसा येथे ते प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, ‘गोद भराई' समारंभ म्हणून साजरी करतात, जेथे सर्व गर्भवती महिला एकत्र येतात आणि त्यांना त्यांच्या बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'पोषण संच' दिले जातात.
केवळ राजस्थानमध्ये 2022-23 मध्ये सुमारे 3.5 लाख महिलांना या योजनेचा लाभ झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दौसाच्या खासदारांनी केलेल्या ट्विटला प्रतिक्रियात्मक उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“दौसाचा हा अनोखा उपक्रम प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेला नवी ऊर्जा देणारा आहे. यामुळे मातांच्या तसेच बाळांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित होत आहे.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931810)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Odia
,
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam