गृह मंत्रालय
केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमध्ये शांतता समिती स्थापन केली
Posted On:
10 JUN 2023 1:04PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमध्ये शांतता समिती स्थापन केली आहे. या समितीत मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या समितीत माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समुदायाच्या गटांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.
परस्परविरोधी पक्ष/ गटांमधील शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटींसह राज्यातील विविध समुदायातील गटांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे या समितीचे कार्य असेल. समितीने सामाजिक एकात्मता, परस्पर सामंजस्य बळकट केले पाहिजे आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ केला पाहिजे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 29 मे ते 1 जून 2023 या कालावधीत मणिपूर राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती.
*****
S.Thakur/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931256)
अभ्यागत कक्ष : 284
Read this releasein:
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada