रेल्वे मंत्रालय
ओदिशातील भीषण अपघातातील मृतांचे कुटुंबीय/ मित्र/ नातेवाईक आणि इतर प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने 139 या हेल्पलाइन क्रमांकावर केली विशेष व्यवस्था
139 या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या दूरध्वनीना उत्तर देण्यासाठी 24x7 रेल्वेकडून वरिष्ठ अधिकारी नियुक्त
या कठीण काळात पीडित प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देऊन योग्य आणि समाधानकारक माहिती देणे हे रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 चे उद्दिष्ट
Posted On:
04 JUN 2023 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2023
ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींचे कुटुंबीय /मित्र /नातेवाईक आणि इतर प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने 139 या हेल्पलाइन क्रमांकावर विशेष व्यवस्था केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांचा एक चमू 24X7 ही हेल्पलाइन चालवत असून विभागीय रेल्वे कार्यालय आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधून संपर्क करणाऱ्या व्यक्तीला संबंधित सर्व तपशील प्रदान करतील. ही सेवा अखंड सुरू राहील. रेल्वे मंत्र्यांनी घोषित केलेल्या मदत निधीचे त्वरित वितरण सुनिश्चित करेल. रेल्वे मंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये; गंभीर जखमींसाठी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
या कठीण काळात पीडित प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देऊन योग्य आणि समाधानकारक माहिती देणे हे रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 चे उद्दिष्ट आहे.
आत्तापर्यंत रेल्वेने 285 प्रकरणांमध्ये (11 मृत्यू प्रकरणे, 50 गंभीर जखमी, 224 किरकोळ जखमी) 3.22 कोटी रुपये वितरीत केले आहेत. भारतीय रेल्वे 7 ठिकाणी (सोरो, खरगपूर, बालासोर, खंतापारा, भद्रक, कटक, भुवनेश्वर) ही मदत वितरीत करत आहे.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929736)
Visitor Counter : 203