वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून 2023 पर्यंत वाढवली

Posted On: 01 JUN 2023 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2023

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) 2020 मध्ये राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची (NSA) सुरुवात केली. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी 1 एप्रिल 2023 पासून अर्ज उपलब्ध असून ते सादर करण्याची अंतिम मुदत आता 15 जून 2023 पर्यंत वाढवली आहे.

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 अर्जाची अंतिम मुदत वाढवल्याने इच्छुक उद्योजकांना त्यांच्या नवोन्मेषी उपाययोजना आणि सखोल सामाजिक प्रभाव दाखवण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023, देशाच्या कानाकोपऱ्यातील नवोन्मेषाला बळ देईल. भारताला विकसित अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याचा मार्ग दर्शवणाऱ्या, अमृतकाळाच्या मुख्य संकल्प उमेदीने मार्गक्रमण करणाऱ्या 'व्हिजन इंडिया @2047' च्या ध्येयदृष्टीशी अनुकुल कार्य करेल.

DPIIT प्रत्येक श्रेणीतील एका विजेत्या स्टार्टअपला 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस देईल. याशिवाय, राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 चे विजेते आणि अंतिम स्पर्धक यांना विशेष पाठबळ सहकार्य मिळेल. यात गुंतवणूकदार आणि सरकारी नेटवर्क, मार्गदर्शन कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय बाजारात संधी, कॉर्पोरेट्स आणि युनिकॉर्नशी जोडले जाण्याची संधी तसेच इतर अनेक महत्वाची संसाधने यांचा समावेश आहे.

या प्रतिष्ठित पुरस्काराचे हे यशस्वी तिसरे वर्ष आहे. भारतीय स्टार्टअप क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींनी दिलेल्या अमूल्य योगदानावर या पुरस्काराने प्रकाश टाकला आहे. NSA ची सुरुवात स्टार्टअप परिसंस्थेमधील उल्लेखनीय स्टार्टअप आणि त्यांना सक्षम करणाऱ्यांचा सन्मान करणे तसेच त्यांना पुरस्कृत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या संस्थांनी नाविन्यपूर्णतेला चालना देण्यात, नवोन्मेषी उत्पादने तयार करण्यात आणि मूर्त सामाजिक प्रभाव प्रदर्शित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

इच्छुकांनी अधिकृत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार संकेतस्थळाला भेट द्यावी आणि 15 जून 2023 च्या सुधारित अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी, भेट द्या  https://www.startupindia.gov.in/

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 




(Release ID: 1929009) Visitor Counter : 144