आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जिनिव्हात "हील इन इंडिया, हील बाय इंडिया" या विषयावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केले बीजभाषण
जागतिक समुदायाची सेवा करणारा हील इन इंडिया, हील बाय इंडिया उपक्रम- एक पृथ्वी एक आरोग्य- या संकल्पनेवर आधारित: डॉ मनसुख मांडविया
Posted On:
24 MAY 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2023
जिनिव्हात 76 व्या जागतिक आरोग्य सभेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी हील इन इंडिया, हील बाय इंडिया या सत्रात प्रमुख भाषण केले. एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेसह जागतिक समुदायाची सेवा करण्यासाठी केंद्र सरकारने मूल्याधारित आरोग्यसेवा उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांना भारतातील आरोग्य क्षेत्रांत काम करणाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे, असे ते म्हणाले.
वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्त्वज्ञानानुसार हील बाय इंडिया उपक्रमाची रचना केलेली आहे. भारतातील आरोग्य सेवा देणाऱ्यांना जगातील विविध भागांत त्यांची सेवा देण्यासाठी पाठवणे हील बाय इंडिया मध्ये अंतर्भूत आहे. तर हील इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत जगभरातील रूग्णांना भारतात एकात्मिक आणि समग्र आरोग्य सेवा मिळणे अभिप्रेत आहे. त्यामुळे जगातून भारतात येणाऱ्या रूग्णांना जागतिक दर्जाच्या, परवडणाऱ्या दरात, उत्तम आरोग्य सेवा भारतात मिळू शकतील असे ते पुढे म्हणाले.
“जगातील सर्वात प्राचीन वैद्यकीय प्रणाली असलेल्या आयुर्वेदाचे भारत हे माहेरघर आहे. या प्रणालीच्या आगळ्यावेगळ्या सामर्थ्यामुळे आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या आयुष उपचारांची मागणी जगभरात वाढली आहे आणि या उपचार पद्धतींना चालनाही दिली जात आहे", असे त्यांनी पुढे सांगितले.
जी20 हेल्थ ट्रॅक अंतर्गत, भारताने आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती, प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद याला प्राधान्य दिले आहे. त्यात एक आरोग्य आणि सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकार (एएमआर); जागतिक स्तरावर औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे आणि सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सेवांची आणि उपचारांची उपलब्धता यावर भर दिलेला आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.
लवचिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करण्यासाठी, भारताने आयुष्मान भारत उपक्रम सुरू केला आहे.
आरोग्यसेवेच्या सर्व पैलूंचा समावेश असलेला हा उपक्रम आहे. रोग निरीक्षण प्रणाली तयार करणे, प्रयोगशाळांचे जाळे विकसित करणे, देशभरात संसर्गजन्य रोगांसंदर्भात ब्लॉक्सची स्थापना करणे आणि एकात्मिक आरोग्य दृष्टिकोनावर भर देऊन संशोधन क्षमता वाढवणे हे पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजनेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींवर कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा मोठा प्रभाव पडला आहे असेही ते म्हणाले. आरोग्यविषयक धोक्यांना राष्ट्रीय सीमांच्या मर्यादा नाहीत आणि रोगाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक पातळीवरच्या समन्वयातून प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे हे कोविड-19 या साथीच्या रोगाने हे दाखवून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926933)
Visitor Counter : 142