पंतप्रधान कार्यालय
आरा येथील विद्युत ग्रीड उपकेंद्राच्या विस्तार कार्याच्या पायाभरणीमुळे या प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक सुखकर होईल :पंतप्रधान
Posted On:
09 MAY 2023 10:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
बिहारमधील आरा येथील विद्युत ग्रीड उपकेंद्राच्या विस्तार कार्यासाठी पायाभरणी झाल्यामुळे बिहारमधील आरा,भोजपूर, बक्सर आणि रोहतास या जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतील लोकांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जामंत्री आर.के.सिंग यांच्या ट्विट संदेशावर पाठवलेल्या प्रतिसादात्मक ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ऊर्जा क्षेत्रातील या विस्तार कार्यामुळे औद्योगिक विकास तसेच रोजगार निर्मितीसोबत इतर अनेक लाभ होणार आहेत. या शिवाय, हे काम पूर्ण झाल्यावर आरा,भोजपूर, बक्सर आणि रोहतास या जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतील लोकांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922947)
अभ्यागत कक्ष : 197
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam