पंतप्रधान कार्यालय

उडान योजनेच्या सहा वर्षांच्या कामगिरीची पंतप्रधानांनी घेतली नोंद

Posted On: 28 APR 2023 10:18AM by PIB Mumbai

उडान योजनेच्या सहा वर्षांच्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंद घेतली आहे. प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना (आरसीएस) उडानने सहा वर्षांपूर्वी शिमला ते दिल्लीला जोडणाऱ्या हवाईमार्गावर उड्डाण केले होते. 473 मार्ग आणि 74 कार्यान्वित विमानतळहेलीपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी चेहरामोहरा बदलणारे ठरले आहेत असे ट्विट नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केले आहे. त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे. 

या ट्विटला उत्तर देताना मोदी म्हणाले कीगेली वर्षे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी परिवर्तनकारी ठरली आहेत. विद्यमान विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहेनवीन विमानतळ जलद गतीने बांधले गेले आहेत आणि विक्रमी संख्येने लोक विमानप्रवास करत आहेत.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 गेली वर्षे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी परिवर्तनकारी ठरली आहेत. विद्यमान विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहेनवीन विमानतळ जलद गतीने बांधले गेले आहेत आणि विक्रमी संख्येने लोक विमानप्रवास करत आहेत. या वाढलेल्या अद्ययावत संपर्क व्यवस्थेमुळे वाणिज्य आणि पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.  #UDANat6” #UDANat6”
 

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920434) Visitor Counter : 126