आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2022 चा सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषातील उत्कृष्टतेसाठीचा पंतप्रधान पुरस्कार राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रदान
Posted On:
21 APR 2023 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाला नवोपक्रम श्रेणी अंतर्गत सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार ( 2022 ) प्राप्त झाला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सचिव राजेश भूषण यांनी आज विज्ञान भवन येथे 16 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविय यांनी या यशाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन केले आणि भारतातील कोविड-19 लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथकपणे काम केल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी, देखभाल करणारा वर्ग आणि समुदाय सदस्यांचे “एकही प्रण हो सबका टीकाकरण’ हा मंत्र घेऊन अथक परिश्रम करणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन” या शब्दात आभार मानले.
लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन चार स्तंभांवर अगोदरच सुरू झाले: संरचित प्रशासन यंत्रणा, उत्पादन वाढवणे, लॉजिस्टिक आणि पुरवठा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांचा समावेश असलेल्या प्रभावी आणि विकेंद्रित लस प्रशासनासाठी अंमलबजावणी धोरणे हे ते चार स्तंभ होय.
राज्य सुकाणू समिती, राज्य कृती दल, जिल्हा कृती दल, ब्लॉक/शहरी कृती दल मार्फत दुहेरी अभिप्राय यंत्रणेसह समुपदेशीय दृष्टिकोनावर आधारित एक मजबूत देखरेख प्रणाली स्थापित केली गेली.
वैज्ञानिक प्राधान्यक्रमानुसार,लसीकरण मोहिमेची कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीला 1.04 कोटी आरोग्य सेवा कर्मचाऱ्याना लसीकरण करून झाली, त्यानंतर आघाडीच्या फळीतील कर्मचारी आणि 60 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या असुरक्षित लोकसंख्येच्या लसीकरणाने ही संख्या जवळपास 30 कोटींपर्यंत वाढली. ज्यामध्ये 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांचा समावेश आहे अशा 106. 02 कोटी लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी टप्प्याटप्प्याने या मोहिमेचा विस्तार करण्यात आला. याची तुलना अनेक देशांच्या एकत्रित लोकसंख्येच्या आकाराशी करता येईल. हा कार्यक्रम 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाला असून आजपर्यंत त्याला 825 दिवस पूर्ण झाले आहेत. क्षमता वाढीने लसींचे सुरक्षित लसवितरण सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
S.No.
|
Date
|
Doses administered
|
No. of Vaccinators
|
No. of active CVCs
|
1
|
27/8/2021
|
1.09 crore
|
56,035
|
57,399
|
2
|
31/8/2021
|
1.42 crore
|
68,273
|
70,017
|
3
|
6/9/2021
|
1.21 crore
|
65,589
|
67,183
|
4
|
17/9/2021
|
2.51 crore
|
98,184
|
1,01,164
|
5
|
20/9/2021
|
1.01 crore
|
63,763
|
65,590
|
6
|
27/9/2021
|
1.08 crore
|
69,876
|
71,519
|
7
|
4/12/2021
|
1.12 crore
|
83,017
|
85,058
|
8
|
3/1/2022
|
1.07 crore
|
92,546
|
95,128
|
9
|
4/1/2022
|
1.03 crore
|
87,956
|
90,335
|
10
|
6/1/2022
|
1.01 crore
|
89,338
|
91,330
|
सुरळीत लसीकरणासाठी Co-WIN (विनिंग ओव्हर कोविड) प्लॅटफॉर्मचा विकास कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण होता.

मिशन इंद्रधनुष पासून प्रेरित होऊन, ज्या व्यक्तींच्या लसीकरण मात्रा घ्यायच्या राहिल्या आहेत अशा व्यक्तींसाठी ‘हर घर दस्तक’ लसीकरण अभियानाच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ ही आणखी एक मोहीम होती जिने गती कायम ठेवली आणि सार्वजनिक आणि खाजगी कार्यालयांचे रहदारीचे मार्ग, धार्मिक यात्रा, औद्योगिक प्रतिष्ठान इत्यादी विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून नवीन रुग्णांची वाढ रोखण्यास मदत केली.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918627)