पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भरती प्रक्रियेसाठीच्या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत

प्रविष्टि तिथि: 19 APR 2023 3:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या बहुकार्य परीक्षा (SSC MTS) आणि सी एच एस एल सी परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. यामुळे प्रत्येक युवकाला या परीक्षेद्वारे नोकरी मिळवण्याची समान संधी मिळणार आहे, त्यासाठी त्यांना भाषेचे अडथळे येणार नाहीत, असे पंतप्रधानानी म्हटले आहे.

मोदी यांनी ट्विट केले आहे :

"प्रादेशिक भाषांवर आम्ही दिला आहे भर आणि आमच्या युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक व्यापक संधी उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न पूर्ण ताकदीनिशी सुरू आहेत"  

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1917887) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam