पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पीएम आवास योजनेच्या लाभार्थी एन.सुब्बुलक्ष्मी यांचे पत्र सामाईक केले
प्रविष्टि तिथि:
12 APR 2023 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी एन.सुब्बुलक्ष्मी यांचे एक हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे. या पत्रात, सुब्बुलक्ष्मी यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रसार भारतीचे माजी बोर्ड सदस्य सी.आर.केसवन यांची, नवी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आपण भेट घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. केसवन यांनी एन. सुब्बुलक्ष्मी यांचे पत्र पंतप्रधानांना दाखवले. सुब्बुलक्ष्मी या मदुराई इथल्या असून, त्या सी. आर. केसवन यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या घराचे फोटो सामाईक केले असून, कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“आज मी @crkesavan यांना भेटलो.त्यांनी एन.सुब्बुलक्ष्मी जी,ज्या त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात, त्यांचे एक अतिशय हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे.मदुराई इथल्या एन. सुब्बुलक्ष्मीजी यांना आर्थिक समस्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत घरासाठी यशस्वीपणे अर्ज केला.”
“त्यांच्या पत्रात एन. सुब्बुलक्ष्मी जी यांनी हे देखील सांगितले की हे त्यांचे पहिलेच घर आहे,आणि त्याने त्यांच्या जीवनात आदर आणि प्रतिष्ठा देखील आणली आहे.त्यांनी आपल्या घराची छायाचित्रे शेअर केली आहेत, आणि कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत. हे असे आशीर्वाद आहेत, जे शक्तीचा मोठा स्रोत आहेत.”
“एन.सुब्बुलक्ष्मीजीं प्रमाणेच असे असंख्य लोक आहेत,ज्यांचे जीवन पीएम आवास योजनेमुळे बदलले आहे.घरामुळे त्यांच्या जीवनात गुणात्मक फरक पडला आहे.ही योजना महिला सक्षमीकरणामधेही आघाडीवर आहे.”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916049)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam